मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिकः- आज माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यावर आले होते. नाशिक मधील सिन्नर परिसरात अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाची त्यांनी पाहणी केली . आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना कोणीही धीर सोडू नका आम्ही शेतकऱ्यांसोबत आहे प्रशासनाला तातडीने मदत जाहीर करायला लावू असं आश्वासन देऊन उद्धव साहेबांनी फक्त आम्हाला तुमच्यासाठी या ठिकाणी पाठवलं आहे असे म्हणत यावेळी शिंदें ना देखील टोला लगावला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की त्यांनी खोके फक्त त्यांच्याजवळ ठेवले आहेत मदतीला दिलेले नाहीत पण आम्हाला राजकारण करायचं नाही ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आम्ही यावर विधानसभेत आवाज उठवू अस देखील शेतकऱ्यांशी बोलताना सांगितलं आहे. तर आदित्य ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना माध्यमांशी देखील त्यांनी संवाद साधला आहे.

