✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा:- जिल्ह्यात मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार घडत आहे. त्यात मोटरसायकल द्वारा घरपोच अवैध दारू, गांजा पुरवणाऱ्या तरुणाची संख्या पण मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
आज शहरात तर मोठा आवाज करणारे सायलेंसर असलेली वाहने भरधाव पळविली जातात. त्याशिवाय अनेक प्रकारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होताना निदर्शनास येते. या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या लोकांचे धागे दणकावले आहे.
29 ऑक्टोबरला एकाच दिवसात तब्बल 334 वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या आदेशान्वये वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली. पोलिसांनी ३३४ वाहनचालकांकडून दोन लाख ८७ हजार २०० रुपये तडजोड शुल्क वसूल केले. जिल्हा वाहतूक पोलिसांतर्फे एकत्रितरित्याही मोहीम राबविण्यात आली.
हिंगणघाट शहरात अवैध दारू तस्करी साठी वापरण्यात येत असलेल्या मोटर सायकल आणि कार याना नंबर प्लेट नसते त्यामुळे पोलिसाना अशा गाड्या ट्रेस करणे मुश्किल होते. हिंगणघाट शहरात नागरिकांची अशी मागणी आहे की अवैध दारू तस्कर यांच्या वीणा नंबर प्लेट वाल्या गाड्यावर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.

