Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

नाशिक शहर परिसरात 1 पासून 15 नोव्हेंबर कालावधी पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी, अनेक बाबींवर निर्बंध.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 1, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक शहर परिसरात 1 पासून 15 नोव्हेंबर कालावधी पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी, अनेक बाबींवर निर्बंध.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- शहर परिसरात 1 पासून 15 नोव्हेंबर कालावधी पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाआरती, वाहनांवर झेंडे लावत शहरात फिरणे, धार्मिक तेढ निर्माण करणारी शेरेबाजी करणे यासह अन्य काही बाबींवर निर्बंध आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली आहे.

शहर परिसरातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, राजकीय वातावरण बिघडले जावू नये यासाठी पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी प्रति बंधत्मक आदेश जारी केले आहेत. या अंतर्गत कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, वापर करणे, तयार करणे, कोणत्याही व्यक्तीच्या चित्रांचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्रांचे, प्रतिमेचे प्रदर्शन तसेच प्रतिमेचे दहन करणे, अर्वाच्च घोषणा देणे, सभ्यता अगर नितीमत्तेस धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथविण्यास प्रवृत्त करेल असे आवेशपूर्ण भाषण करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही अशा कृत्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून शहरात फिरणे, पेढे वाटणे, फटाके वाजवणे, घंटानाद करणे, धार्मिक तेढ निर्माण करणारी शेरेबाजी करण्यास मनाई करण्यात आली आहे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास तसेच पोलीस आयुक्तांच्या परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.

Previous Post

वर्धा जिल्हात एकाच दिवसात 334 वाहन चालकांवर कारवाई, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याचे धागे दणकावले.

Next Post

तरोडा येथे समता सैनिक दलाची कार्यकारिणी गठीत व शाखा फलकाचे अनावरण.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
तरोडा येथे समता सैनिक दलाची कार्यकारिणी गठीत व शाखा फलकाचे अनावरण.

तरोडा येथे समता सैनिक दलाची कार्यकारिणी गठीत व शाखा फलकाचे अनावरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In