✒️प्रविण जगताप, प्रतिनिधी
वर्धा:- जिल्हातील पुलगाव येथून 02 नोव्हेंबर रोजी एक चेन स्नॅचींगची खळबजनक घटना समोर आली होती. दोन चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील आभूषण लुटल्याची घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती.
02 नोव्हेंबर रोजी सौ. राखी मंडले रा. हरीराम नगर, पुलगाव यांनी पोलीस स्टेशन पुलगाव येथे येवुन तक्रार दिली कि, फिर्यादी ही त्यांची सासु व जाऊ यांचे बरोबर दुर्गादेवी पाहुन घरी जात असतांना दोन अनोळखी आरोपीनी फिर्यादीचे जाऊच्या समोर मोपेड गाडी आणुन फिर्यादीचे गळयातील 3 तोळयाची पोत किंमत अंदाजे 96,000 रूपये जबरीने हिसकावुन तोडुन चोरून नेली. अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पुलगाव येथे अप.क्र. 895/ 2022 कलम 392, 34 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असल्याने सायबर सेल व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे कडुन गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात आला. सदर गुन्ह्याचे तपासात कोणताही पुरावा उपलब्ध नसतांना सदर गुन्ह्याचा सायबर सेल मार्फत तांत्रीक दृष्ट्या तपास करुन यातील आरोपी सतीश उर्फ सचिन अरुणराव अंबुलकर, वय 27 वर्ष, रा. यशवंत कॉलनी, वर्धा, श्रृंखल ललीत मडामे, वय 20 वर्ष, रा. बरांडा, पुलगाव, संकेत शरदराव कोराम, वय 22 वर्ष, रा. वार्ड नं. 02, बोरगाव (मेघे) यांना निष्पन्न करुन ताब्यात घेतले.
सदर आरोपीतांना वरील गुन्ह्याबाबत कौशल्यपुर्ण रित्या विचारपुस केली असता आरोपीनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
सदर आरोपीची सखोल विचारपुस केली असता यातील आरोपी सतीश अंबुलकर यांचे आर्वी नाका चौकात झुनका भाकरची खाणावळ असुन त्याचे खाणावळ मध्ये आरोपी श्रृंखल ललीत मडामे हा काम करत होता. त्यांनी दोघांनी संगणमत करुन पो.स्टे. पुलगाव, पो.स्टे. आर्वी, पो.स्टे. वर्धा शहर, पो.स्टे. सेवाग्राम परीसरात चेन स्नॅचींगचे गुन्हे केल्याचे कबुल करुन गुन्ह्यातील मुद्देमाल वितळवुन आरोपी संकेत शरदराव कोराम याचे मार्फतीने सोने विकुन पैसे प्राप्त करणार होते. आरोपी संकेत शरदराव कोराम याचा ताब्यातुन सोन्याचे दागिने वितळवुन सोन्याचे ४ गडे वजन ७६ ग्रॅम, ३२० मिली किंमत २,९७,६४० रु. व १ ओप्पो कंपनीचा मोबाईल किंमत १०,००० रु. व यातील आरोपी सतीश अंबुलकर यांचे ताब्यातुन गुन्हे करणेकरीता वापरलेली एक पांढऱ्या रंगाची विना नंबरची एसेस मोपेड वाहन कि. ९०,००० रु. व १ आयफोन कंपनीचा मोबाईल कि. ८०,००० रु. असा एकुण जु.कि. ४,७७,६४० रु. चा मुद्देमाल जिल्ह्यातील वेग वेगळ्या पो.स्टे. चे गुन्ह्यातील असल्याने एकुण ४ गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला असुन जिल्ह्याच्या अभिलेखावरील इतर गुन्हे
उघडकिस येण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, यांचे निर्देशाप्रमाणे स.पो.नि. महेंद्र इंगळे, पो.उप.नि. बालाजी लालपालवाले व पोलीस अंमलदार हमीद शेख, नरेंद्र डहाके, दिपक जाधव, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, प्रमोद पिसे, दिनेश बोथकर, विशाल मडावी, अनुप कावळे, अक्षय राऊत, अंकित जिभे, अतुल भोयर, मनिष कांबळे, रामकिसन इप्पर, नितीन ईटकरे, पवन पन्नासे, शाहीन सय्यद, स्मिता महाजन यांनी केली.

