वैशाली गायकवाड उपसंपादक पुणे
पुणे:- पिपरी चींचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) मागील 18 वर्षापासून काम करणाऱ्या वर्ग तीन आणि वर्ग चारमधील मानधनावरील 304 कर्मचारी कायम सेवेच्या प्रतीक्षेत आहेत. 2 वर्ष काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना कायम करण्यात येत आहे. मात्र अनेक वर्षापासून काम करणाऱ्या कामगारावर अन्याय करण्यात येत आहे. अशी माहिती महाराष्ट्र संदेश न्युजला या कामगारांनी दिली.
मग आम्ही वर्षानुवर्षे काम करणारे कर्मचारी नाहीत का? आमच्यावर हा अन्याय का? असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसले आहे. महापालिकेकडून कोणत्याही सुविधा देण्यात येत नसल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी आहे.
मागील 15 ते 20 वर्षांपासून हे कर्मचारी स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा एंट्री ऑपरेटर, क्ष-किरण तंत्रज्ञ, ब्लड बॅंक तंत्रज्ञ, नेत्र चिकित्सा सहाय्यक, फार्मासिस्ट, स्त्री-पुरुष कक्ष मदतनीस (वॉर्ड आया आणि वॉर्ड बॉय), नेत्र चिकित्सा सहाय्यक, ई.सी.जी.तंत्रज्ञ, वाहन चालक, रेडिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. मासिक वेतन महिन्याच्या 10 ते 15 तारखेपर्यंत देण्यात येते, तसेच राज्य कर्मचारी विमा योजना, भविष्यनिर्वाह निधी, ग्रॅच्युइटी अशा कोणत्याही सुविधा नाहीत. शिफ्टच्या रोटेशननुसार सुटी आणि वर्षातून केवळ सहा किरकोळ रजा मिळतात. सेवेत कायम करण्यासाठी त्यांनी वर्षभरापूर्वी न्यायालयात दावा दाखल केला आहे. परंतु, प्रशासनाने या पदासाठी 12 वर्षांपूर्वी परीक्षा घेतली. या कर्मचाऱ्यांना महापालिकेने सर्वसाधारण सभेत 2020 मध्ये प्रस्ताव केला आहे. तरीही दोन वर्षापासून निव्वळ बोळवण केली जात आहे. म्हणून सर्वजण 18 नोव्हेंबरपासून ‘अन्नत्याग’ आंदोलन करणार आहोत. अशा इशारा यावेळी देण्यात आला आहे.