वैशाली गायकवाड उपसंपादक पुणे
पुणे:- येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका इमारतीच्या बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी उघड्या पाण्याच्या टाकीत पडून बांधकाम मजुराच्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा दुर्डविरीत्या मृत्यु झाल्याची घटना घडली या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हि घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजता मांगडेवाडी परिसरात घडली. दरम्यान, मुलीच्या मृत्युस जबाबदार असल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदाराविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंशिका सुनील सहानी वय 2 वर्ष असे मृत्यु झालेल्या चिमुकल्या मुलीचे नाव आहे. तर मुलीचे वडील सुनील सहानी वय 27 वर्ष यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन बांधकाम व्यावसायिक सचिन चोरगे व ठेकेदार शिवाजी पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज भागातील मांगडेवाडी परिसरात चोरगे यांच्या इमारत प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. तर फिर्यादी सुनील सहानी हे तेथे बांधकाम मजूर काम करीत आहेत. तसेच ते त्यांच्या कुटुंबीयांसह इमारत बांधकाम प्रकल्पाच्या परिसरातच राहतात.
दरम्यान, अंशिका हि शुक्रवारी सकाळी खेळत होती. खेळता खेळता तिचा तोल जाऊन ती पाण्याच्या टाकीत पडली. पाण्यात बुडुन तिचा दुर्दैवी मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोचून पाहणी केली. त्यावेळी संबंधित पाण्याच्या टाकीला झाकण नव्हते. तसेच बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने हि दुर्घटना घडल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.