प्रशांत जगताप
हिंगणघाट दि.१४ नोव्हें:- हिंगणघाट विधानसभा काँग्रेस कमिटी तर्फे भारताचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे प्रणेते पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त पंडितजींना अभिवादन करण्यात आले तसेच देशाच्या विकासा करिता असलेल्या नेहरुजींच्या योगदानास उजाळा देण्यात आला. सदर कार्यक्रम माजी आमदार अशोक शिंदे (माजी राज्यमंत्री तथा प्रभारी हिंगणघाट विधानसभा काँग्रेस) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी डॉ. रामकृष्ण खुजे महासचिव वर्धा जिल्हा काँग्रेस, पंढरीभाऊ कापसे, माजी नगराध्यक्ष तथा अध्यक्ष हिंगणघाट शहर काँग्रेस, विनायकराव चौधरी, माजी, नगराध्यक्ष, शालीकराव डेहणे,शंकरराव जनबंधु, नरेंद्र चाफले, जिल्हाध्यक्ष, वर्धा जिल्हा सोशल मीडिया विभाग काँग्रेस, अविनाश जमुनकार, समुद्रपूर तालुका अध्यक्ष, काँग्रेस, गुणवंत कारवटकर, उपाध्यक्ष, हिंगणघाट शहर काँग्रेस, प्रमोद, जुमडे, सुरेश गायकवाड, सुनील हरबुडे, अखिल धाबर्डे, दामोदर वानखेडे, परेश बाभुलकर, रवींद्र लढी, राजु हिंगमीरे, प्रमोद नौकारकर, सारंग कोयाडवर, दिलिप हिवंज, गुणवंत वानखेडे, भोला चव्हाण, सतीश चरडे, सुरेश गोहणे, अंकुश ससाणे व इतर बहुसंख्य काँग्रेस कायकर्त्यांची उपस्थिती होती.