✒️प्रशांत जगताप, संपादक
मुंबई:- सध्या राज्यातील राजकीय वातावरण दूषित झाल्याचे दिसून येत आहे. त्यात आता काही राजकारणी महिलाना हातची बाहुली समजून लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात पुढे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण भविष्यात धोकादायक होणार असल्याचे तरी चित्र दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पण या आरोपात किती तथ आहे हे व्हिडिओ वरून समोर येत आहे.
या घटनेचा आता व्हिडीओ समोर आला असून.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कळव्यातल्या एका पुलाच्या उद्घाटनाला गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाडही होते. त्यावेळी मुख्यमंत्री बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीबाहेर गर्दी झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यावेळी जितेंद्र आव्हाड गर्दीतून वाट काढत होते. काही लोकांना बाजूला सारत होते. त्यावेळी ही महिलाही समोर आली. तिच्या खांद्याला हात लावून आव्हाडांनी या महिलेला बाजूला सारलं.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही येत आहे. शिवसेनेच्या विदर्भातल्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. जबरदस्ती तुमचा रस्ता कोणी रोखणारं बाजूला व्हा सांगून ऐकत नसेल तर तुमच्यावरच गुन्हा दाखल होणार का?, असंही त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.

