Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे येथील नवले ब्रिजवर भीषण अपघात, अनेक वाहनं एकमेकांवर आदळली, अनेक नागरिक जखमी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 21, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे येथील नवले ब्रिजवर भीषण अपघात, अनेक वाहनं एकमेकांवर आदळली, अनेक नागरिक जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️विनोद पिसाळ, पुणे प्रतिनिधी

पुणे:- येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. येथील नवले पुलाच्या परिसरात एक भीषण अपघात झाल्याचे माहिती समोर आली आहे. यात अनेक गाड्यांचे नुकसान झाले असून अनेक लोक जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

सध्या पुण्यात अपघातचे सत्र सुरूच आहे. काल रात्रीच्या सुमारास नवले पुल असलेल्या परिसरात भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातामध्ये 24 गाड्यांचे नुकसान झाले असल्याच समोर आले आहे. या अपघातात सहा जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या 2 रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू केलं होत. या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेत काही नागरिकांच्या मदतीनं अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरु करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महाराष्ट्र संदेश न्युजला मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात नवले फुलावर नव्हे तर नजीकच्या परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लागलीच सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कंटेनरने धडक दिल्यामुळे या सर्व गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात एकूण 24 गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान या अपघातात अद्याप तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती आहे.

सातारहून पुण्याच्या दिशेने येणारा ट्रक कात्रजच्या नवीन बोगद्यातून नवले पुलाच्या दिशेने येत असताना या ट्रकवरचे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक समोरील वाहनांना उडवत पुढे गेला. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात तेल गळती झाल्याने वाहतुक बराच वेळ थांबवावी लागली. पुण्यातील नवले पुल हा अपघातांचं केंद्र बनला असून अनेक निष्पापांना प्राण गमवावे लागले आहेत. कारण आहे या ठिकाणी चुकलेली रस्त्याची रचना. तीव्र उतार आणि वळणे एकत्र झाल्याने पुण्यातील नवले पुलाचा भागा अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

“प्रेंमविरांचे कॉलेज किस्से” आजचे वास्तव स्थिती दर्शवणारी प्रेमाची कथा.

Next Post

भामट्याच्या हातात एटीएम देणे एकाला महागात पडले, संपूर्ण अकाऊंट साफ झाले. दोन भामटे सिसिटिव्हीत कैद.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
भामट्याच्या हातात एटीएम देणे एकाला महागात पडले, संपूर्ण अकाऊंट साफ झाले. दोन भामटे सिसिटिव्हीत कैद.

भामट्याच्या हातात एटीएम देणे एकाला महागात पडले, संपूर्ण अकाऊंट साफ झाले. दोन भामटे सिसिटिव्हीत कैद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In