महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर:- अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पोलिस पथकाने संगमनेर शहरातील लखमीपुरा, देवी गल्लीरोड आदी ठकाणी अवैधरीत्या चालणार्या जुगार अड्ड्यांवर छापा टाकत 1 लाख 64 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी 11जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, शहरातील लखमीपुरा, देवीगल्ली रोड येथे सोनी टॉवर इमारतीच्या पार्किंगमध्ये अवैधरीत्या विनापरवाना कल्याण मटका नावाचा हार जितीचा जुगार खेळत असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांना खबर्यामार्फत समजली. त्यांनी तत्काळ अ. नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पोलिस पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर पोलिस पथकाने संगमनेर येथे येऊन छापा मारत धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी रोकड रक्कम ,जुगार साहित्य मोबाईल असा एकूण 1 लाख 64 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी अ. नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक शंकर चौधरी यांनी संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्या दीवरून शहर पोलिसांनी आयान साजीद सय्यद वय 23 वर्षे, कोल्हेवाडी रोड, संगमनेर , हसनैर रौफ पटेल वय 23 वर्षे, रा. अलका नगर, संगमनेर, शाहीद सलीम मन्सुरी वय 30 वर्षे, शेरु शफिक शेख वय 27 वर्षे, दोघे रा. कोल्हार ता.राहाता, नावेद आश्रप सय्यद वय 20, वर्षे रा. जहागीरवाडा, संगमनेर, आत्तार शोएब सत्तार वय 32, वर्षे, रा. कोल्हार ता. राहाता, नीयाज अली यासुद्दीन शेख वय 27 वर्षे, रा. तीनबत्ती चौक, संगमनेर , शाहरुक साजीद सय्यद वय 27 वर्षे, आरबाज रियाज देशमुख वय 22 वर्षे, दोघे, रा. जहागीरदारवाडा, संगमनेर , ईजाज शेख अब्दुल करीम वय 28 वर्षे, रा. मोगलपुरा, देवी गल्ली, संगमनेर व आश्रफ समशेरअली जहागीरदार रा. जहा गीरदारवाडा, संगमनेर या 11जणांविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 9 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.पुढील तपास पो. नि. राजेंद्र भोसले व पो. नाईक सचिन उगले करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

