सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- स्विस्तर वृत्त असे आहे की मध्य रेल्वेचे महत्वाचे स्थानक तसेच मध्य रेल्वे, दक्षिण पुर्व मध्य, तसेच दक्षिण रेल्वे च एक महत्वाचं जक्शन म्हणुन बल्लारशाह रेल्वे स्थानकाची ओळख आहे त्यामुळं बल्लारशाह स्थानकात सतत वर्दळ असते त्याच बल्लारशाह रेल्वे स्थानकावर आज सायंकाळी 5:00 वाजताच्या दरम्यान अपघात घडला बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. 1 ते 5 ला जोडणाऱ्या ओव्हर ब्रिज चा काही अंशी भाग कोसळला असून त्यामुळं काही वेळ गोंधळ उडाला होता. विश्वसनीय सूत्रांच्या माहीती नुसार या अपघातात 10 ते 12 प्रवाशी जख्मी झाले असून त्यांचेवर ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे उपचार सुरु आहे. विशेष बाब म्हणजे या अपघातात काही प्रवाशी गंभीर जख्मी झाल्याचं वृत्त आहे. तसेच जखमींची संख्या आणखी वाढू शकते.

