आदर्श मराठी प्राथमिक शाळेतील विध्यार्थीना नेफडो संस्थेतर्फे वही, पेन भेट.
संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा दी.6 डिसेंबर:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा तर्फे बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथील विध्यार्थीना एक वही एक पेन भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भास्करराव येसेकर, सचिव, बा. शी. प्र. मं. हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नलिनी पिंगे, आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका तथा नेफडोच्या राजुरा तालुका महिला संघटिका, बादल एन. बेले, राष्ट्रीय हरीत सेना विभाग प्रमुख, स्काऊट लीडर तथा नेफडो चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, ज्योती कल्लूरवार, जेष्ठ शिक्षिका, रुपेश चिडे, सहाय्यक शिक्षक तथा नेफडोचे चंद्रपूर जिल्हा सचिव आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन एक वही एक पेन दान करून साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपक भवर, राष्ट्रीय सचिव सचिन वाघ यांच्या मार्गदर्शनात देशासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी हा उपक्रम घेण्यात आला. आदर्श शाळेतील विध्यार्थीनी मनोगत व गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना मारोटकर यांनी तर प्रास्ताविक नलिनी पिंगे यांनी केले. आभार प्रदर्शन रोशनी कांबळे यांनी केले.

