Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी घेतला मोठा निर्णय, तडकाफडकी दिला सदस्यपदाचा राजीनामा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 11, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी घेतला मोठा निर्णय, तडकाफडकी दिला सदस्यपदाचा राजीनामा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
पुणे:-
सध्या राज्यात अनेक नेते मंत्री वारंवार महापुरूषांबद्दल वादग्रस्त विधान करत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. हे असतानाच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील वादग्रस्त विधान केलं त्यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण झाला. त्यामुळे संपूर्ण राज्यात निषेध आणि आंदोलन सुरू आहे. त्यात काल चंद्रकांत पाटील यांच्या वर शाई फेकण्यात आली. राज्यात महापुरुषांचा अपमान सुरू असतानाच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमां अंधारे यांनी आपल्याकडे असलेल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

अंधारे यांनी उच्च व तंत्र शिक्षण खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. सुषमा अंधारे यांनी हा राजीनामा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडं पाठवला आहे तर राजीनाम्याचं पत्र त्यांनी फेसबुक अकाऊंटवर शेअर केलं आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधान..
शाळा कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलेलं नाही, त्यांनी लोकांकडं भीक मागितली. हे विधान करताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातील उपरणं पुढे पसरून दाखवलं.

सुषमा अंधारे यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील हे सर्व मंडळी आमच्या जगण्याचे आदर्श आहेत. पण गेली काही महिने सातत्याने या महापुरुषांचा अपमान करण्याचे षडयंत्र भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून घडवून आणले जात आहे. महामहीम राज्यपाल पदावरील व्यक्तीपासून ते ना. मंत्री, सभागृहातील सदस्यांपर्यंत रोज कुणीतरी महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य आणि महाराष्ट्राच्या अस्मिता पायदळी तुडवणे याची जणू स्पर्धाच लागली आहे.

समितीतील इतर सदस्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांच्या सत्सत विवेक प्रश्न आहे मात्र माझ्यासाठी अशा परिस्थितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य पदाची जबाबदारी जी साधारण वर्षभरापूर्वी मी स्वीकारली होती. व सत्तांतरानंतरही निव्वळ बाबासाहेबांच्या विचारांशी बांधिलकी म्हणून ही जबाबदारी घेतलेली होती. परंतु ही समिती उच्चतंत्र शिक्षण मंत्रालयाच्याच अखत्यारीत येते आणि जर याच खात्याचे मंत्री यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल इतके हिन दर्जाचे विचार असतील तर समितीतील सदस्य पदापेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान आमच्यासाठी लाख पटीने महत्त्वाचा आहे. सबब आपण केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ करून मी या समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

नर्सरीतील मजुराना ब्लेंकेटचे वाटप करून विलास कुंदोजवार, नागपूर विभाग अध्यक्ष, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती यांचा वाढदिवस साजरा.

Next Post

वैशाली बुद्ध विहार वाघोडा पंच कमिटीच्या वतीने पत्रकार अनिल अडकिने व गणमान्य व्यक्तीचा सत्कार.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वैशाली बुद्ध विहार वाघोडा पंच कमिटीच्या वतीने पत्रकार अनिल अडकिने व गणमान्य व्यक्तीचा सत्कार.

वैशाली बुद्ध विहार वाघोडा पंच कमिटीच्या वतीने पत्रकार अनिल अडकिने व गणमान्य व्यक्तीचा सत्कार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In