अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं. -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- तालुक्यातील ग्रा.पं.वाघोडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वैशाली बुद्ध विहार मध्ये दोन दिवसीय भव्य भीम गीत व भजन संमेलनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्यातून 15 भजन मंडळ सहभागी झाले होते. वैशाली बुद्ध विहार पंच कमिटीच्या वतीने समाजातील रूण फेडणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यात निर्भीड पत्रकार महाराष्ट्र संदेश न्यूजचे तालुका प्रतिनिधी अनिल अडकिने, वरिष्ठ पत्रकार युवराज मेश्राम विदर्भ चीप ब्युरो तसेच सेवकराम राऊत दैनिक निर्भिडचे संपादक यांचा पंच कमिटीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुळुक, रामरावजी मोवाडे, संदीप भोंगाडे, अशोक निंबाळकर, मारुती वासाडे, उत्तम बागडे, शिवमंगल पाल, गुणवंता लांजेवार, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सेवकरामजी सोमकुवर, वैभव ढवळे, भागवत बागडे, माधुरी बारमासे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवर यांचाही सत्कार करण्यात आला व त्यांनाही शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी मंडळी उपासक उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348