राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपीपरी:- तरुणावर बेरोजगारीची टांगती तलवार लटकत असल्यामुळे त्यात तालुक्यात रोजगारीच्या संधी उपलब्ध होत नसल्याने अनेक युवक लगतच्या तेलंगणात राज्यात कामाला जात असतात.
घरची परिस्थिती हलाकीची असल्याने किरमिरी येथील बजरंग सोयाम हा युवक तेलंगणा येथे विटा बनविन्याच्या कामाला गेला होता मशीनचा जबर शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे.
गोंडपीपरी तालुक्यातील किरमिरी येथील बजरंग सोयाम हा 24 वर्षीय युवकही तेलंगणात रोजगरा निमित्त गेला होता. त्याला एका कंपनीत विटा बनविन्याचे काम त्याला मिळाले. विटा तयार करीत असतानाच अचानक मशीन चा जबर शॉक लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बजरंग सोयाम यांचा वडिलांचे मागच्या वर्षी निधन झाले. त्यामुळे घरचा कर्ता पुरुष निघून गेल्याने कुटूंबाची जबाबदारी बजरंग वर आली होती. अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने मिळेल ते काम करून तो कुटूंबाची मदत करीत होता. वडिलांच्या मृत्यू नंतर आई आणि लहान भाऊ यांचा पालन पोषणाची जबाबदारी बजरंगवरच होती. तेलंगणात विटा बनवीत असताना अचानक
मशीनचा जबर शॉक लागल्याने बजरंगचा मृत्यू झाल्याने सोयाम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती गावात पसरताच हळहळ व्यक्त केली जात आहे.

