तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- श्री तिरुपती बालाजी देवस्थान चुनाळा येथील मंदिरात 17 व्या ब्रम्होत्सव सोहोळ्या अंतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन श्री. सब्बुलक्ष्मनन चीफ जनरल मॅेनेजर अंबुजा सिमेंट उपरवाई यांच्या हस्ते, श्री श्रीराम पी.एस.युनिट हेड अल्ट्राटेक सिमेंट आवारपुर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून साईकृपा ट्रान्सपोर्टचे संचालक दिलबागसिंघ दांडा, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार लक्ष्मणदास काळे महाराज, देवस्थानचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, आर्यन कोल बेनिफिके शनचे श्री राजबिरसिंघ, अल्ट्राटेक सिमेंट चे मॅनेजर गौतम शर्मा, चुनाळा येथील, नवी मुंबई येथे वास्तव्यास असलेले निवृत्त अग्निशमन व सुरक्षा महाप्रबंधक जयप्रकाश केशवराव हेपट, प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. शंकर बुरान, ग्रा. पं. चुनाळा चे सरपंच बाळू वडस्कर, माजी सरपंच संजय पावडे, देवस्थानचे पदाधिकारी प्रा. वाय.राधाकृष्ण, शंकर पेद्दुरवार, सुरेश सारडा, अशोक शाहा, मनोज पावडे, गोरखनाथ शुंभ, ज्येष्ठ नागरिक जानबा पाटील, वडस्कार व मान्यवर उपस्थित होते. देवस्थान च्या वतीने आयोजित शिबिरात सेवाग्राम मेडिकल कॉलेज चे नेत्रतज्ञ डॉ. अजहर शेख, डॉ.आलीन मुरके, डॉ.प्रांजल जैन, डॉ.वीरेंद्र कराडे, डॉ.मयूर आईटवार, समाज सेवक सचिन ताकसांडे, अविनाश धोंगडे इत्यादींची उपस्थिती होती.

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 750 रुग्णांची तपासणी केली. देवस्थानाच्या या सेवाभाव उपक्रमामुळे खेड्या पाड्यातील शेतकरी, कष्टकरी गरिबांना दृष्टी प्राप्त करून देण्याचे कार्य अविरत केल्याजात असल्यामुळे देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार सुदर्शन निमकर व देवस्थान कमेटीचे अभिनंदन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात साईकृपा ट्रान्सपोर्टचे संचालक दीलबागसिंघ दांडा यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी जयप्रकाश हेपट यांनी चुनाळा येथील १० व्या वर्गातील गुणवंत विद्यार्थी कू. काजल डोंगरे व कुणाल मत्ते यांना शिक्षणा करिता प्रत्येकी दहा हजार रु. ची आर्थिक मदत केली.