सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
मो 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. 11 ते 17 डिसेंबर पर्यंत सिकलसेल सप्ताह राबवण्यात येतो. सप्ताह दरम्यान सिकलसेल आजाराविषयी माहिती व जनजागृती करण्यात येते याच उद्देशाने डॉ. रामटेके शल्यचिकित्सक, शासकीय रुग्णालय, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात बजाज पॉलिटेक्निक येथे सिकलसेल आजारा संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक भारती चित्रे मॅडम या होत्या. सोबतच युवा सामाजिक कार्यकर्ते सिद्धांत पुणेकर व प्रामुख्याने उपस्थित बजाज पॉलिटेक्निक येथील विधाते सर, मालखेडे सर, नगराळे मॅडम, पाटील मॅडम व अंकिता जगताप मॅडम यांनी उपस्थित होत्या.