राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- श्री माता कन्यका सेवा संस्था व श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान, धाबा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नामदार सूधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सहकार्याने चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री सूधीरभाऊ मुनगंटीवार यांचा स्विय सहाय्यक शैलेश बैस व गोंडपिपरी तालुक्याचे तहसीलदार आदरणीय के. डी मेश्राम यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्हा परिषदचे माजी सदस्य चंद्रपूर अमर बोडलावार यांच्या वाढदिवसा निर्मित विविध कार्यक्रम यशस्वीरितीने संपन्न झाले.
अमर बोडलावार, माजी जि.प.सदस्य चंद्रपूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री कोंडय्या महाराजांचा आशिर्वादाने दिवसाची सूरूवात झाली. तसेच समस्त जनतेच्या सूख समृद्धीसाठी, आनंदासाठी महादेवाचा अभिषेक करून प्रार्थना यावेळी करण्यात आली. महाराजांच्या कृपेने तसेच सर्व प्रेमळ मित्रमंडळाकडून राबविण्यात आलेले समाजाभिमुख कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पडले. यात रक्तदान शिबिरात 48 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजासाठी मोलाच योगदान दिले.

यावेळी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी चष्मेवाटप, मोफत मोतीबिंदू शस्रक्रियेसाठी निवड करून त्यांना वर्धा येथील सेवाग्रामला पाठविण्यात आले. यावेळी आधार कार्ड अपडेट करणे, पोस्ट व बॅंकाचे विमा काढणे, ई उपक्रम जनतेच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत घेण्यात आले. यावेळी गूळाचा तूलाभार करून वाटप करण्यात आले आणी उपस्थितांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. रक्तदात्याना घडी व भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमाला स्वप्नील अनमूलवार, नंदाताई घोगरे, हिराजी कंदीकूरवार, अरूणजी कोडापे, संजयजी येलमूले, निलिमाताई कंदीकूरवार, अनिशा शेख, बबनजी पत्तीवार, बाबूरावजी बोमकंटीवार, आशिष मामीडपेल्लीवार, हरीश घोगरे, बबनजी निकोडे, नाना येल्लेवार, अरूणा जांभूळकर, साईनाथ मास्टे, सूहासजी माडूरवार, विजयजी शेरकूरवार, राहूल चौधरी, गणपती चौधरी, बंटी बोनगिरवार, निश्चल मारशेट्टीवार, अखिल चंदनगिरीवार, निखिल चंदनगिरीवार, सूरज भस्की, सूरज फरकडे, अक्षय पोटे, संस्कार बोडलावार, समीर माडूरवार तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहून अथक परिश्रम घेतले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348