निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कढोली खुर्द येथील एका 12 वीत शिकणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थिनीचा अपघातात दुर्दैवीरित्या जागेवरच मृत्यू झाला. गायत्री रवींद्र बोंडे असे मयत झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
बाखर्डी गावाजवळ आज सकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. गायत्री बोंडे ही आपल्या नातेवाइकांच्या मुलीच्या साक्षगंध असल्यामुळे ती बाखर्डी येथे गेली होती. साक्षगंधा चा कार्यक्रम आटपून गायत्री ही त्या मुलीसह ती गडचांदूरकडे बाईकने निघाली होती. दरम्यान कारने बाईकला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर ज्या मुलीचा साक्षगंध होता ती मुलगी आणि दुचाकी चालक गंभीर जखमी झाले. त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले.

मृतक गायत्री बोंडे ही महात्मा गांघी कनिष्ठ महाविद्यालयाची बारावीची विद्यार्थिनी होती. ती अभ्यासात हुशार होती. शाळेतील विविध उपक्रमात तिचा सक्रिय सहभाग असायचा. गायत्रीच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गायत्रीचा मृत्यूमुळे तिच्या परिवारावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करून मृतेदेह शविच्छेदनासाठी रूग्णालयात नेण्यात आला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348