सौ. राजश्री ढमाळ, सातारा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सातारा:- ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते. आज त्याची मतमोजणी झाली त्यात सातारा जिल्हात अनेक ग्रामपचायत मध्ये धक्कादायक निकाल हाती आले आहे.
सातारा जिल्हातील खंडाळा तालुक्यातील आसवली गावातील ग्रामपंचायत वर राष्ट्रवादीचा पक्षाने आपला झेंडा फडकवला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ यांच्या पक्षाने जबरदस्त भरघोस मतांनी विजयी झाले आहे.
शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री शंभूराज देसाईंना पण धक्का बसला आहे. सत्ता आली पण सरपंच राष्ट्रवादीचा झाला आहे. तर, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचा पराभव झाला आहे. सातारा जिल्ह्यातील किवळ ग्रामपंचायतीत सत्तांतर झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसने १२ पैकी १२ जागांवर विजय मिळवत भाजपा आणि शिंदे गटाला धुळ चारली आहे.
तर, चरेगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली असून १० जागांवर विजय मिळवला आहे. तर विरोधी गटाला ३ जागांवर समाधान तर सरपंचपदी देवदत्त माने हे निवडुन आले आहेत. तर दुसरीकडं कराड तालुक्यातील पश्चिम सुपने ग्रामपंचायत निकाल पहिला हाती आला आहे. यामध्ये पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या गटांनी 4 जागांवर विजय मिळवला आहे. तर विरोधी राष्ट्रवादीला २ जागा मिळाल्या असून सरपंच पदावर राष्ट्रवादी गटानं २ मतानं विजय मिळवला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348