मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाईन नाशिक:- आज शहरात मोठ्या प्रमाणात दुचाकीला मोटर सायकलला मॉडीफाय केलेले सायलेन्सर लावून कर्णकर्कश्य आवाज करत फिरणार्यांच्या दुचाकी स्वाराची डोक्यातील हवा नाशिक शहर पोलिसांनी काढली आहे. पोलिसांनी शहरात बुधवारी दि.२१ विविध ठिकाणी नाकाबंदी करीत २६ दुचाकी जप्त केल्या आहे. २६ जणांना न्यायालयात पाठविण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना रात्री नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बुधवारी दि.२१ पोलीस ठाणेनिहाय व शहर वाहतूक शाखेसमवेत नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले होते. नाकाबंदीदरम्यान सायलेन्सर लावण्यात आलेल्या २६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली असून, आता त्यांना न्यायालयात पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी आरटीओशी संपर्क साधण्यात आला आहे.
दुकानदारांना मात्र अभय
आरटीओच्या परवानगीविना वाहनांमध्ये परस्पर बदल करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे नाशिक शहर पोलीस आणि आरटीओ यांनी संयुक्तपणे वाहने मॉडीफाय करणार्या दुकानदारांविरुद्धदेखील कठोर कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा, अशा कारवाईतून खरे दोषी सहीसलामत सुटतात आणि समस्या कायम राहून ध्वनी प्रदूषण वाढ होत आहे.
६३०८ जनाकडून ३२ लाख दंड वसुन
१ डिसेंबरपासून शहर वाहतूक शाखेतर्फे विशेष मोहीम राबविण्यात आली असून, ६ हजार ३०८ विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या दुचाकीचालकांना ३१ लाख ७२ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. जे वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतील, त्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जे चालक पुन्हा नियमांचे उल्लंघन करतील, त्यांचे लायसन्स रद्द करण्यासंदर्भात कारवाई केली जाणार आहे.

