Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

संगमनेर ग्रामपंचायत निवडणुक विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्त्याची आपसात मारहाण, धमकी, मग पोलिस स्टेशन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 22, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
संगमनेर ग्रामपंचायत निवडणुक विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्त्याची आपसात मारहाण, धमकी, मग पोलिस स्टेशन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- संगमनेर तालुक्यातील आंभोरे ग्रामपंचायत निकालानंतर विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या दोन गटांत वादावादी होऊन तुंबळ हाणामारी झाली आहे. यात दोन्ही गटाचे काही कार्यकर्ते जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांचे जनसेवा मंडळ आणि माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये ही धुमश्चक्री उडाली. दोन्ही मंडळाकडून एकमेकांच्या विरोधात फिर्यादी देण्यात आल्या असून, तालुका पोलिसांनी दोनही गटांच्या 30 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

जनसेवा मंडळाचे सचिन संपत खेमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायण सहादू खेमनर, रंगनाथ सहादू खेमनर, हरिभाऊ सहादू खेमनर, सहादू दामू खेमनर, राधा दामू खेमनर, शरद राघू खेमनर, बाळासाहेब दगडू खेमनर, दगडू बिरू खेमनर, भरत राघू खेमनर, भास्कर गोविंद जऱहाड, कोंडाजी हनुमंत वाघमोडे, नारायण कोंडाजी वाघमोडे व बाळासाहेब दगडू खेमनर, शुभम भास्कर जऱहाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकरी विकास मंडळाच्या कोमल शरद खेमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रावण गोविंद खेमनर, प्रकाश गणपत खेमनर, संपत गोविंद खेमनर, सचिन संपत खेमनर, अक्षय श्रावण खेमनर, अशोक गोविंद खेमनर, गणपत गोविंद खेमनर, अजय अशोक खेमनर, योगेश संपत खेमनर, अभय श्रावण खेमनर, ज्योतिबा नामदेव जगन्नर, पंढरीनाथ गंगाराम वाघमोडे, नारायण गंगाराम वाघमोडे, मंगल संपत खेमनर, गोविंद सखाराम खेमनर, सविता अशोक खेमनर, दीपाली प्रकाश खेमनर व अनुराधा सचिन खेमनर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम जऱहाड याने मंगळवारी सायंकाळी सचिन खेमनर यांचा चुलतभाऊ प्रकाश खेमनर याला शेतकरी विकास मंडळाकडून उमेदवारी करणाऱया दगडू खेमनर यांचा पराभव झाल्याचा राग मनात धरून धक्काबुक्की करत मारहाण केली होती. तर, त्याच्यासोबत असलेल्या बाळासाहेब खेमनर याने जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. त्याचवेळी त्यांच्या इतर साथीदारांनी चुलतभाऊ, चुलत्यांना शिवीगाळ, दमदाटी करीत लाथा बुक्क्यांनी, काठीने व कटरने वार करून ठार मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कोमल खेमनर यांचा दिर नारायण खेमनर यांचा ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झाल्यानंतर दुपारी ते गावातील मारुती मंदिरासमोर उभे होते. त्यावेळी श्रावण खेमनर व प्रकाश खेमनर यांनी तेथे येत त्यांना दमदाटी करीत शिवीगाळ केली. त्यानंतर कोमल खेमनर या आपली जाव व सासऱयासोबत दुचाकीवरून जनावरांना चारा आणण्यासाठी जात असताना वरील आरोपींनी कोमल यांच्यासह त्यांचे पती शरद, दिर नारायण, चुलत सासरे सहादू व सासरे राधू यांना शिवीगाळ, दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. यात कोमल यांच्या कानातले झुबे व सोन्याचे गंठणही गहाळ झाले. या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.

Previous Post

कर्णकर्कश्य आवाज करत कानठळ्या बसविणार्‍या २६ दुचाकी नाशिक पोलिसांनी केल्या जप्त,३२ लाखाचा दंड वसुल.

Next Post

खुनाचा प्रयत्न करून फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट-६ ने केले जेरबंद

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
खुनाचा प्रयत्न करून फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट-६ ने केले जेरबंद

खुनाचा प्रयत्न करून फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट-६ ने केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In