महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलडाणा दि.23 डिसें:- बुलडाणा जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात सारशिव गावातील महिला सरपंचाला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली.त्यात ती जखमी झाल्याने आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसात गेली तर पोलिसांनी तिची तक्रार घेतली नाही.
तू फुकट सरपंच झाली असं म्हणत 14 ते 15 लोकांनी या महिला सरपंचाला घरात घुसून मारहाण केली आहे. इतकंच नाही तर या लोकांनी सरपंच महिलेच्या मुलांनादेखील मारहाण केली. मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींविरुद्ध महिला सरपंच रमाबाई जाधव यांनी सुरुवातीला जानेफळ पोलीस स्टेशन गाठले. मात्र त्या ठिकाणी त्यांची तक्रार घेण्यात आली नाही.
नंतर थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे या सरपंच महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्या सरपंच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून तक्रार घेऊन त्या महिलेला पुन्हा जानेफळ पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले. मात्र ती महिला ताटकळत जानेफळ पोलीस स्टेशनला बसलेली होती. तरीही मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत कारवाई करण्यात आली नाही.
त्यामुळे महिला सरपंच हतबल झाल्या आहेत. मारहाणीत हात फॅक्चर झाला असल्याचा आरोप महिला सरपंचाने केला आहे. गंभीर प्रकारची तक्रार असूनही पोलीस मात्र या घटनेकडे दुर्लक्ष करत आहेत. पोलीस हे प्रकरण गांभीर्याने का घेत नाहीत हा मोठा प्रश्न आहे. आता त्या सरपंच महिलेला न्याय कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत असून सरपंच महिला न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र घरात घुसून महिला सरपंचाला अशाप्रकारे मारहाण केली गेल्याने एकच गोंधळ उडाला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348