महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सामायिक विहिरीवरून शेतात पाणी भरण्यास जाण्याच्या रस्त्याच्या वादावरून दोन गटात तुंबळ हाणामार्या झाल्या आहे.याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसात दोन्ही गटातील 8 जणांवर विनयभंग व हाणामार्या या कलमान्वये गुन्हा दाखल केला असल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कोंची शिवारातील पिंपळवाडी परिसरात घडली आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेली पहिल्या घटनेची अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कोंची अंतर्गत येत असणार्या पिंपळवाडी परिसरामध्ये एकमेकांचे चुलत भाऊ असलेले दोन कुटुंब राहत आहे.
एकाच सामायीक विहीरीतून दोघेही पाणी उपसून शेती करत आहे. बुधवारी सकाळी विहिरीवरील विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गव्हाचे उभे पीक तुडवित का जातोस? बांधावरुन जा, असे चुलत पुतण्यास सांगितल्याचा राग अनावर झाल्यामुळे दोन भावांची एकमेकांत जुंपली. पुतण्याने आपल्या चुलत्यास आणि चुलतीस लाथाबुक्क्यांसह काठीने मारहाण केली. तसेच चुलतीचा विनयभंग केला.
या बाबत या महिलेने तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी बाप-लेकासह घारगावला राहणारा अमोल पंढरीनाथ गाडेकर आणि मुंबईतील वाशी येथील अमित रावसाहेब साळुंखे, आशाबाई रावसाहेब साळुंखे व संगीता भानुदास लोखंडे या सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348