राज शिर्के, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
मुंबई:- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई सह संपूर्ण राज्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी देशभरातील अनेक मान्यवरांनी रामदास आठवले यांच्या वाढदिवस दिनी अभिष्टचिंतन केले.
संघर्षनायक म्हणून रामदास आठवले यांचा वाढदिवस दरवर्षी दि. 25 डिसेंबर ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे संघर्षदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार काल देशभर रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून रिपाइं तर्फे देशभर साजरा करण्यात आला.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथे बाळासाहेब गरुड अध्यक्ष ईशान्य मुंबई, भाऊ पंडागळे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे नागरिकांना फळ मिठाई वाटप करण्यात आले. रिपाइं मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, रिपाइं दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे यांच्या नेतृत्वात चेंबूर कॉलनी येथे रामदास आठवले यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. उत्तर मुंबई येथे रिपाइं चे उत्तर भारतीय आघाडीचे रमेश गौड, दहिसर तालुका अध्यक्ष दिलीप व्हावळे, गुजरात निरीक्षक जतीन भुटटा, मुलुंड येथे योगेश शिलवंत विनोद जाधव, अजित रणदिवे आदींच्या पुढाकारात रामदास आठवले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348