महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन घारगाव:- नाशिक – पुणे महामार्गावर पुण्याच्या दिशेने बटाटे घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाला रात्रीच्या वेळेस गतिरोधकाचा अंदाज न आल्याने ट्रक समोरील अज्ञात वाहनाला धडकून दुभाजकावर आदळला गेला. यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले असून. सुदैवाने ट्रकचालक आणि क्लिनर दोघे बचावले आहे.
नाशिक – पुणे महामार्गावर शनिवारी रात्री 11.15 वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे अपघात झाला. या अपघात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातामुळे नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने प्रवाशांनी डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवंशी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली.
याबाबत अधिक माहिती अशी, ट्रक क्रमांक एम.पी. ०७ एच.बी. २७८८ मधून चालक व क्लिनर नाव समजू शकले नाही हे ग्वालियर मध्यप्रदेश येथून बटाटे घेऊन नाशिक – पुणे महामार्गाने पुणे जिल्ह्यात जात असताना शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास ते संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे आले असता ट्रक चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने ट्रक समोरील अज्ञात वाहनाला धडकला. पुढे गतिरोधकावर आदळून दुभाजकावर चढला. यात ट्रकचे मोठे नुकसान झाले. चालक स्टिअरिंगमध्ये अडकला असता महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी त्याला सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र, नाशिककडे जाणारी एक लेन बंद झाल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

