विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आस्तगाव:- येथे येशु नवी आशा चर्च शिर्डी येथे नाताळ सण ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या उत्साहाता साजरा केला. शहरातील विविध चर्चमध्ये सकाळी धार्मिक विधी झाल्यानंतर ख्रिश्चन बांधवांनी चर्चमध्ये दर्शनासाठी गर्दी केली. चर्चवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
नाताळनिमित्त शहरातील चर्च सजविण्यात आले होते. चर्चवर विद्युत रोषणाईसह ख्रिसमस ट्री, केक तसेच सांताक्लॉजनीही बच्चे कंपनीला भेट दिली. सकाळी विविध चर्चमध्ये धार्मिक विधी करण्यात आला. सकाळी धार्मिक विधी ‘मिसाबली’ झाला. त्यानंतर या चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांनी दर्शनासाठी गर्दी केली. चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले होते. चर्चमध्ये येत एकमेकांना शुभेच्छा देत नागरिकांनी नाताळ सण साजरा केला. मिठाई, केकचे वाटप करत प्रभू येशूंचा जन्मोत्सव उत्साहात साजरा केला.
येशू नवी आशा चर्च शिर्डी या चर्च चे संस्थापक रेव्ह. विश्वास त्रिभुवन कार्यक्रमात म्हटले 2021 वर्षा पूर्वी या जगात येणे कशा साठी होते. प्रभू येशू ख्रिस्तानी प्रेम, दया, शांतीचा मार्ग खूप सुंदर मार्ग या जगाला सांगितला आहे. या बदल त्यांनी रेव्ह. विश्वास व त्यांचा टीम ने गीते गाऊन आराधना केली. छोट्या लेकराची डान्स, नाटक, असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडली. या कार्यक्रमाप्रसंगी पोलिस पाटील श्री. राजेश त्रिभुवन व सभापती श्री. निवास त्रिभुवन, गॉस्पल सिंगर पास्टर साहिल गायकवाड व चर्च मधील मंडळी इतर मान्यवर उपस्थित होते.