अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो.नं. -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन काटोल:- नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काटोल तालुक्यातील मेटपांजरा जिल्हा परिषद सर्कल मध्ये 9 ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये भाजपा समर्थित 6 ग्रामपंचायती मध्ये विजय संपादित केला. तर 2 ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस तर 1 ग्रामपंचायत मध्ये अपक्ष उमेदवार निवडून आले.
ग्रा.पं.सोनखांब येथील सरपंच पदाकरिता सरीता प्रवीण अडकिने, ग्रा.पं.घुबडीत शीला ज्ञानेश्वर काैरती, ग्रा.पं. पांजराकाटे सीमा परसराम वानखेडे, ग्रा.पं.कोंढासावळीत सुनंदा राजेंद्र युवनाते, ग्रा.पं.चारगाव येथील माधुरी संघपाल बागडे, तसेच ग्रा.पं.मेंढे पठार येथील अभय नामदेव कोहळे भरघोस मतांनी निवडून आले.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकही ग्रामपंचायत जिंकता आली नाही.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांच्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये एकही ग्रामपंचायत राष्ट्रवादीला जिंकता आलेली नाही. त्यामुळे सलिल देशमुख यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होत आहे.
ग्रामपंचायत सोनखांब येथे जनतेने दिलेला कौल हा विकासाचा आहे.जो विश्वास जनतेने टाकला त्याला तडा जाणार नाही. मेटपांजरा जिल्हा परिषद सर्कल मध्ये मूलभूत सुविधा पुरविल्या जाईल . असे आश्वासन मेटपांजरा जिल्हा परिषद सर्कल प्रमुख, माजी सरपंच तथा संचालक कृ.उ.बा.स. काटोल श्री. प्रवीण महादेवराव अडकिने सोनखांब यांनी दिले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348