✒️प्रविण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
मो .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- चेतना स्पोर्टिंग क्लब हिंगणघाट द्वारा आयोजित महिला पुरुष व्हॉलीबॉल चे खुले सामने मोहता हायस्कूल चा प्रांगणात आयोजित केले होते या व्हॉलीबॉल सामन्यात महिला पुणे संघाणे प्रथम क्रमांक पटकाविला तर दुसरा क्र. पवनार आणि तिसरा क्र छत्तीसगड संघाने पटकाविला यावेळी विजेत्या संघाला मान्यवरांचा हस्ते पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुलभाऊ वांदिले’ यांनी याप्रसंगी विविध क्षेत्रातील मैदानी खेळावर खास करून व्हॉलीबॉल या खेळावर मार्गदर्शन केले.यावेळी प्रमुख उपस्थिती दशरथजी ठाकरे, अमोल बोरकर, माजी नगरसेवक बालाजी गहलोद, सौ पद्मा गहलोद, माजी नगरसेवक विनोद झाडे, बबलू शेख, ऋषभबाबू गांधी, राजुभाऊ जांभुलकर, विनोदजी लाहोटी, शैलेशजी गेडाम, श्यामली बन्सोड (गेडाम), गोमाजी मोरे, हेमंत चिरकुटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष सुशील घोडे, जिल्हा महासचिव राजू मुडे, पंकज भट आदी मान्यवर उपस्थित होते.

