तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- तालुक्यातील विरूर स्टेशन येथील रस्त्याचे बांधकाम थंड बस्त्यात होते. सरपंच यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील विरुर स्टेशन येथील मुख्य कामाचे भूमिपूजन करून श्रीगणेशा केला.
विरुर येथील मुख्य रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे अशी गावकऱ्यांची मागणी जोर धरू लागली होती त्यातच ठेकेदार गाहोलोत यांनी आज करू उद्या करू यातच वेळ घालवला पण वर्ष होऊन सुध्दा मुख्य रस्त्याचे काम करण्यास असमर्थ पना दाखवली व त्यांच्या मते स्थानिक गावातील काही नागरिक अडचण निर्माण करून काम थांबवण्याचे काम करीत असून हे काम मी बिलकुल करणार नाही असे स्पष्ट केले व त्या नंतर थोरात यांनी मुख्य रस्त्याचे काम हाती घेऊन 2 महिन्यात काम पूर्ण करण्याचे सरपंच अनिल आलाम यांना आश्वासन दिले व गावातील नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
सरपंच अनिल आलाम यांनी गावकऱ्यांना केले आवाहन कामात कोणतीही अडचण किंव्हा आपल्यास कोणतीही त्रुटी आढळत असेल तर आपण सर्वांनी ठेकेदाराला त्रास न देता कार्यकारी अभियंता यांच्याशी विचारणा किंव्हा तक्रार करावी पण चालू झालेल्या कामाला होणारे काम कृपया बंद करू नये आपल्या गावातील मुख्य रोड लवकर कसा होईल याकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे अशी मागणी केली.

