सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे स्काऊट गाईड उपक्रम अंतर्गत दिनांक: 30 डिसेंबर 2022 रोजी दुपारी: 1.30 वाजता खरी कमाई हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात शाळेचे विद्यार्थी सोहम अमरदीप दुर्गे, साहिल कवरपाल डुलगच, अथर्व नितेश हिकरे, कु. आनंदी अनिल गवई, कु. राशी राहुल वेले, कु. रूपाली मनोज निमकर, राजेश अशोक पानमवार, नक्ष गणेश दुर्गे आदींनी खरी कमाई चे पदार्थ विक्री करण्यासाठी बनवून आणले होते.
श्री. बी. बी. भगत मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्काऊट गाईड चे शिक्षक श्री. एस. एम. चव्हाण सर आणि सौ. एस. एन. लोधे मॅडम यांच्या उपस्थितीत सदर विद्यार्थ्यांनी शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना खरी कमाईचे पदार्थ विक्री केले. यावेळी श्री. आर. के. वानखेडे, श्री. एम. डी. टोंगे, श्री. यु. के. रांगणकर आदी शिक्षक, श्री. दिनेश भाले बाबू, श्री. वामन बोबडे, श्री. वाल्मीक खोंडे, श्री. सुरेश मोरे, श्री. इंद्रभान अडबाले आदी शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थीवृंद उपस्थित होते. सर्वांनी खरी कमाई च्या पदार्थाचा आस्वाद घेतला.

