सौ.हनिषा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथील कार्यरत सहाय्यक शिक्षक राजू किसनराव वानखेडे यांना इंडिया ऑयकानिक एज्युकेशन अवार्ड नुकताच जाहीर करण्यात आला. तो त्यांना वर्चुअल अवार्ड सेरेमनी कार्यक्रमात दिनांक 31 डिसेंबर 2022 रोजी देण्यात आला.
श्री. राजू किसनराव वानखेडे हे एम. एस. सी. (विषय संप्रेषण- गणित) मार्च 2017 च्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम आले होते. ती परीक्षा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक (महाराष्ट्र) यांनी आयोजित केली होती. त्यात श्री. राजू किसनराव वानखेडे यांनी” वर्धा नदीतील जैवविविधता ” या विषयावर संशोधन प्रकल्प सादर केला होता.