वसावित्रीच्या लेकी उच्च श्रेणी मूख्याध्यापिका सौ. रेखाताई कारेकर यांचा माजी जि.प.सदस्य सौ वैष्णवीताई बोडलावार यांचा हस्ते सत्कार व निरोप समारंभ संपन्न.
राजेद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- जिल्हा प्राथमिक शाळा भंगाराम तळोधी येथे 3 जानेवारी 2023 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच उच्च श्रेणी मुख्याध्यपिका सौ रेखाताई कारेकर (2013-2022 ) यांच्या स्वेच्छासेवापूर्ती निरोप समारंभ शाळेच्या वतीने साजरा झाला.
शाळेच्या वतीने तसेच माजी जि.प.सदस्या सौ वैष्णवीताई बोडलावार यांनी मा सौ रेखाताई कारेकर यांचा त्यांचा कार्य काळात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दलव शाल व श्रीफळ देऊन अभिनंदन केले व पूढील वाटचालीस शूभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष म्हणून भंगाराम तळोधीचे सरपंच सौ लक्ष्मीताई बालूगवार, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सत्कारमूर्ती रेखाताई कारेकर दहा वर्ष भंगाराम तळोधीत उच्च श्रेणी मुख्याध्यापिका म्हणून सेवा दिली या काळात त्यांचा या गावाशी भावनिक नाळ जूळला सत्कार करतांना भावूक होऊन त्यांचा डोळ्यातून येणाऱ्या अश्रू आवरू शकले नाही.
यावेळेस तिथे भंगाराम तळोधीचे उपसरपंच सूरेंद्र घाबर्डे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राकेश कटकमवार उपाध्यक्ष अजय पेरकावार, शा. व्य. स.सदस्य, अजय गज्जमवार, प्रियंका, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348