पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- 1 जानेवारी म्हणजेच शौर्य दिन. या दिवशी पुणे जिल्हातील भीमा नदीच्या काठावर वसलेलं कोरेगावचे गाव या गावात 1 जानेवारी 1818 या दिवशी कोरेगाव भीमाची लढाई झाली. या युद्धामध्ये पेशव्याच्या विरुद्ध ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात दलित समाजातील सैन्यबळाचा वापर केला. ब्रिटिशांनी पुकारलेल्या या युद्धात सहभागी होतं असताना दलित सैनिकांचा उद्देश हा इंग्रजांना युद्ध जिंकून देण्यापेक्षा जाचक पेशवाईलाच चाप बसवण्याचा मुख्य उद्देश होता.
पेशवे व इंग्रज यांच्यात झालेल्या युद्धात इंग्रजांच्या बाजूने लढत असलेल्या दलित रेजिमेंटमधील सैनिकांनी पेशव्याच्या सैनिकांचा धुव्वा उडवीला. अवघ्या 16 तासांमध्ये पेशव्यांच्या सैन्याला जेरीस आणत पराभव पत्करण्यास भाग पाडले. या युद्धात इंग्रजांचा विजय झाला. म्हणजेच प्रामुख्याने दलित रेजिमेंट जिंकली. या युद्धात पेशव्यांच्या विरुद्ध दलित रेजिमेंटच्या सैन्यानी लढलेला समतेचा, हक्काचा, न्यायाचा लढाईत अनेकांनी प्राण गमावले. युद्धात प्राणाची आहुती दिलेल्या दलित रेजिमेंट सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाची उभारणी करण्यात आली. या स्तंभावर युद्धात विरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे कोरण्यात आली.
शौर्याचे प्रतीक असलेल्या विजय स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 रोजी आपल्या अनुयायीसह भेट देत मानवंदना दिली होती तेव्हा पासून हजारो दलित लोकं दरवर्षी मोठ्या उत्साहाने भीमा कोरेगावला येतात. One of The Triumphs Of The British Army Of the Earth असे लिहीत ब्रिटिशांनी शूर दलित सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी 75 फूट उंच विजय स्तंभ उभारला त्यावर 20 शहिद व 3 जखमी दलित सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभवार लिहिली आहेत.
या वेळी 1 जानेवारी या दिवशी भीमा कोरेगावला जाताना वाद विवाद होऊ नये तसेच शांतता प्रस्थापीत करण्यासाठी शिरूर पोलीस ठाणे अधिकारी निरीक्षक अभिजित पवार, सहाय्यक फौजदार गोपीनाथ चव्हाण, पोलीस अंमलदार शिवाजी बोथे, पोलीस अंमलदार सोडनवर. पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शाम घाडगे, व्यवस्थापक कृष्णातं महामुनी, उपाध्यक्ष अविनाश जोशी, संघटक विठ्ठल ठोंबरे यांच्या मार्गदर्शनानुसार शिरूर शाखा अध्यक्ष नरेंद्र रावळ, उपाध्यक्ष सोहेल शेख, शिरूर महिला अध्यक्षा सौ. कल्पना पुंढे, संपर्क प्रमुख सौ. हिना शेख, प्रतिभा लुंकडं सभासद – सुदाम रणदिवे, सुरेश शिंदे, अनिल मोहिते, विलास लुंकडं, दत्ता खाडे, सतिश भालेकर, ब्रम्हा पठारे, प्रदीप बोरा, सचिन सोनवणे,आप्पा ढवळे, गोरक्ष चव्हाण, आदी उपस्थित होते. 1 जानेवारी शौर्य दिन या दिवशी सर्वांनी आपले योगदान मोठ्या संख्येने दिले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348