मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- समाजातील, देशातील घडामोडीसह घडलेला इतिहास हा विद्यार्थांना समजावून सांगतांना त्यांची बुध्दी विवेक पटलावर आनंददायी दाखले देवून विद्यार्थांना राजमाता आई जीजाऊ, छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, आई हिरकणी, राणी लक्ष्मीबाई, महात्मा फुले, आद्य शिक्षणाच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले, शेख फातिमा, यासह थोरपुरुष, क्रांतिकारी आदर्श वत महापुरुष, समाजसेवी यांचे जीवनपट माहिती, संवाद विद्यार्थांना ज्ञानवर्धक ठरली तर प्रगती गाठता येते असे परखड मत प्रदीपकुमार नागपुरकर यांनी व्यक्त केले.
ते परडा येथील स्व. संजय गांधी विद्या निकेतन विद्यालयाचे संस्थापक माजी आमदार स्व. देवरावजी उर्फ दादासाहेब कोल्हे स्मृति व्याख्यान मालेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय महासचिव प्रदीपकुमार नागपुरकर होते तर उद्घाटक रत्नाकर कोल्हे, तास, प्रमुख वक्त्या युवती किर्तनकार कु. वैष्णवी अतकरे नागपुर, प्रमुखअतिथि मुख्याध्यापक मिलींद मुळे आदी मान्यवर पिठासीन होते.
या कार्यक्रमाचे सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती व स्व. दादासाहेब कोल्हे, यांचे प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. दिनांक २ ते ६ जनवरी पाच दिवसीय चालणा-या व्याख्यान मालेचे प्रथम पुष्प गुंफतांना ” विद्यार्थांचे आनंदी जीवन” या विषयावर संवाद साधतांना कु. वैष्णवी अतकरे म्हणाली की, आनंद कसा घ्यावा तो ज्यांनी त्यांनी आप आपल्या पध्दतीने ठरवायचा असतो, पण विद्यार्थी जीवनामध्ये अभ्यासू, अभ्यासने, यासह आपल्या आवडी-निवडीसह कलागुणाला बहरत ठेऊन त्याची एकाग्रता अंगीकृत करत यात नैपुण्यता शिखर पादक्रांत करणे जे-जे आपणास आवडते त्यास संस्कृतिमय जोड देत आपला विकास साध्य करीत पुस्तकी ज्ञानासह चौफेर ज्ञान विकासशील मनुष्य जन्म स्वार्थकी ठरावा असा प्रयत्न करायचा व आपणचं आपले आदर्शमय जीवनाचे भाग्यकर्ते बनलात तर निराशा कधीच मनाला शिवणार नाही त्यामुळे आपण आनंदित जीवनाचे आनंदी यात्री बनल्याशिवाय राहणार नाही. आपली मातृभूमि भारतमाता क्रांती घडविणारी ती क्रांतीकारी ज्वालामुखी आहे हा ईतिहास मांडतांना त्यांनी आनंदी कसे राहवे आपल्या ४० मिनिटांचे व्याख्यान शैलीतून आजच्या मोबाइल माध्यामाचे शिकारी भक्त व पाश्चात्य संस्कृतिचे जोपासक हे तर विद्यार्थींनी भगिनींनी आवर्जून लक्षात घेतले पाहिजे, असे मत कु.अतकरे यांनी मांडले. उद्घाटन भाषण करतांना रत्नाकर कोल्हे म्हणाले कि हा समाज पुरुष प्रधान म्हटलं जात असला तरी हा देवीकृपा प्रसाद व बलिदानी महान देशभक्तांचा देश युवकांचा भारत होय. यासाठी आप-आपसात विचाराची देवाणं-घेवाणं होणे साठी विचारयुक्त व्याख्याने होणे महत्वाचे असते असे ते म्हणाले. कार्यक्रम प्रसंगी “युवा-संस्कार” मासिक पुस्तके भेट म्हणून देण्यात आले. सुत्र संचालन कु.उज्वला तितरे (महाजन), तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक मिलींद मुळे यांनी केले, बंडू लोंढे, धर्मेन्द्र झोंटींग, डाहाके, यासह सर्वा शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

