विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि. 20 जुलै रोजी पोलीस स्टेशन एटापल्ली हद्दीतील मौजा कृष्णार या गावात गडचिरोली पोलीस प्रशासन, पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून निलोत्पल पोलिस अधीक्षक गडचिरोली, एम रमेश अपर पोलिस अधीक्षक अभियान गडचिरोली, सत्य साई कार्तिक अपर पोलीस अधीक्षक अहेरी, गोकुळ राज अपर पोलिस अधीक्षक प्रशासन गडचिरोली, चैतन्य कदम उपविभागीय पोलिस अधिकारी एटापल्ली यांचे मार्गदर्शन खाली भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा व विर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन करून कृषी मेळाव्याच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच कार्यक्रमाचे उदघाटक CRPF 191 बटालियनचे कमांडंट अमरसिंग गुज्जर तसेच प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार चौधरी, तसेच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी नागरगोजे, पो उप नि गजानन साखरे, कृषी सहायक एटापल्ली निलेश बोरे तसेच आरोग्य अधिकारी सूर्यवंशी, पशुवैद्यकीय अधिकारी श्री काळे नगर पंचायत एटापल्ली चे श्री रसाळ, श्री देशमुख व सदर कार्यक्रमास गावातील पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, महिला मंडळी उपस्थित व एटापल्ली पोलिस स्टेशन चे सर्व अंमलदार उपस्थित होते.
यावेळी उपस्थित नागरिकांना कृषी सहायक श्री नीलेश बोरे यांनी शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनाबाबत मार्गदर्शन करून त्याच्या लाभ घेण्याबाबत सांगितले. तसेच पोलीस दादा लोरा खिडकीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम, प्रशिक्षण रोजगार व शासकीय योजना बाबत पोलिस स्टेशन एटापल्ली चे प्रभारी अधिकारी श्री नागरगोजे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांना विविध शेती उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले

