आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील खडकी येथे एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी 8 महिन्यांची गर्भवती राहिल्याने खळबळ उडाली आहे. या मुलीला फिट आल्याने रुग्णालयात नेण्यात आले होते यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता मुलगी 8 महिन्यांची गर्भवती असल्याचे तपासणीत कळलं. त्यामुळे कुटुंबाचा पायाखालची वाळू सरकली. ही घटना रविवारी उघडकीस आली.
त्यानंतर मुलीच्या आईने खडकी पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ती यांची 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी आणि 15 वर्षाचा मुलगा हे दोघे गेली 2 वर्षांपासून मित्र आहे. या मुलाने पिढीत मुलीवर बरोबर मागील 2 वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवले होते. तसेच एका महिलेच्या घरी घेऊन जाऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिली. याघटनेचा पुढील तपास खडकी पोलीस करत आहे.

