उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन तासगाव:- विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढत संजयकाका पाटील यांनी तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत दमदार पुनरागमन केलं आहे. स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी थेट नगरपालिकेची सत्ता काबीज करत आमदार रोहित पाटील यांच्या गटाला म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. एकूण 24 जागांच्या नगरपालिकेत संजय पाटील स्वाभिमानी विकास आघाडीने 13 जागांवर विजय मिळवला, तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला 11 जागांवर समाधान मानावं लागलं. नगराध्यक्षपदी स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या विजया पाटील विजयी झाल्या.
तासगाव नगराध्यक्षपदी स्वाभिमानी विकास आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विजया बाबा पाटील याची निवड झाल्याबदल आणि रोहन मोहन कांबळे यांची तासगाव नगर पालिका नगर सेवकपदी निवडून आल्याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

