रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भव्य पक्ष प्रवेश सोहळ्या पार पडला, यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे परतूर-मंठा विधानसभेचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया आणि युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्वांचे राष्ट्रवादीत स्वागत करून पक्षाच्या विचारधारेवर आधारित लोकहितासाठी व पक्षवाढीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी दादांच्या नेतृत्वाखाली पक्ष नेहमीच आपल्या पाठीशी असेल’, असा विश्वास दिला.
याप्रसंगी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. राजेश विटेकर, जालना-संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. मनोज कायंदे, मधुकरराव आर्दड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस रविंद्र तौर, पक्षाचे जालना जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण, जालना जिल्हा सरचिटणीस बळीराम कडपे आणि जिल्ह्यातील पक्षाचे सर्व सेलचे प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

