संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी :- चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव पंचायत समिती सर्कल काँग्रेस कार्यकर्ता आढावा बैठक लाठी येथे पार पडली. यात माजी आमदार सुभाष धोटे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून द्या. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी परिश्रम घ्या असे आवाहन केले.
यावेळी गोंडपिपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास सातपुते, फिरोज पठाण, सरपंच विनोद जगताप, सरपंच धीरेंद्र नागापुरे, उपसरपंच साईनाथ कोडापे, नरेंद्र वाघाडे, लाठी सेवा सहकारी संस्थेचे प्रवीण लोखंडे, किशोर मेंगरे, उमेश सोनलकर, जीवनदास नगराळे, बाबुराव बोंडे, नीळकंठ रागीट, नामदेव धोटे यासह गोंडपिपरी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

