महीला पुरुष भजन मंडळाचे कार्यक्रमाचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी केले उद्घाटन. तीन दिवस चालणार विवीध कार्यक्रम.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान राजुरा येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२६ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता देवस्थानचे ट्रस्टी तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांच्या हस्ते महिला – पुरुष भजन मंडळाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला त्याचे विधिवत उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हेमंतराव पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलिस स्टेशन राजुरा, देवस्थान देखरेख समिती चे अध्यक्ष मारोतराव येरणे, उपाध्यक्ष प्रकाश बेजंकिवार, सचिव भाउराव बोबडे, सह सचिव प्रशांत गुंडावार, भाउराव खाडे , रामचंद्र आदे, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, श्री. सोमेश्वर मंदिर देवस्थान देखरेख समिती व सोमेश्वर युवक सेवा मंडळाचे पंढरी लोहे, नितीन मेंढे, किरीट बोलम, अमोल झाडे, अरविंद वाघाडे, संदिप आदे आदींसह प्रमुख पदाधिकारी यांची प्रामुख्यानं उपस्थीती होती.
दि. २७ फेब्रुवारीला सायंकाळी ७:३० वाजता ह.भ.प. विवेक महाराज कुरुमकर, राष्ट्रीय कीर्तनकार, ग्रामगीता प्रचारक वडगांव ता. मूर्तिजापूर जिल्हा अकोला यांचें समाजप्रबोधनावर जाहीर कीर्तन आयोजीत करण्यात आले आहे. दि. २८ फेब्रुवारीला सकाळी अग्निकुंडाचा कार्यक्रम राहील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूजी कुचनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन भाउराव बोबडे यांनी मानले.
यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने राजगिर्याचे लाडू प्रसाद वितरण करण्यात आले. राजुरा शहरातील अनेक सामजिक संस्था, संघटना, सोमेश्वर युवक सेवा मंडळ यांनी साबुदाणा खिचडी, केळी, दूध वितरण केले. तीन दिवस भक्तिमय वातावरणात हा महाशिवरात्री उत्सव सुरु राहणार असून या प्राचीन ऐतीहासिक सोमेश्वर मंदिर देवस्थानात हजारो भक्तभाविक दर्शन घेणार आहेत. नगर परिषद, पोलिस विभाग, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सोमेश्वर मंदिर युवक सेवा मंडळ आदींसह शहरातील सेवाभावी नागरीकांचे सहकार्य लाभले आहे.

