प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राज्यातील माहे जानेवारी 2024 ते माहे डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणा-या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुक न होऊ शकलेल्या ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक तसेच ग्रामपंचायतीतील सदस्य, थेट सरंपचाच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुंकारीता पारंपारिक पध्दतीने मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकी साठी वापरलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरुन प्रभाग निहाय मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. यासाठी दि.19 मार्च रोजी प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. दि. 19 ते 24 मार्च पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे. दि.26 मार्च रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. असे उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रामपंचायत निवडणुक श्रीपती मोरे यांनी कळविले आहे.

