Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

शेकडो नागरिकांचे जनता दरबारातून समाधान पालकमंत्री डॉ. भोयर यांनी परंपरा कायम ठेवली, जिल्हातून नागरिकांची तोबा गर्दी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 17, 2025
in वर्धा, विदर्भ
0 0
0
शेकडो नागरिकांचे जनता दरबारातून समाधान पालकमंत्री डॉ. भोयर यांनी परंपरा कायम ठेवली, जिल्हातून नागरिकांची तोबा गर्दी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.16:- राज्यमंत्री म्हणून राज्यभर कर्तव्याची पूर्तता करतानाच गृह जिल्ह्यातील सामान्य जनांचे प्रश्न ही तत्परतेने सुटावे, याकरिता राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी रविवारी, 16 मार्च रोजी जनता दरबाराचे आयोजन करून आपली परंपरा कायम ठेवली. जनतेच्या प्रश्न – समस्यांशी निगडित विविध प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शेकडो प्रश्नांचा तत्काळ निपटारा करण्यात आला, तर तेवढ्याच प्रश्नांना सोडविण्याकरिता पालकमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला कामाला लागण्याचे निर्देश दिले.

आमदार म्हणून डॉ. पंकज भोयर यांनी सतत जनता दरबाराचे आयोजन करून जनतेचे प्रश्न सोडविले होते. त्यांनी सुरू केलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडयाची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली होती. हा सेवा पंधरवडा संपूर्ण राज्यात राबविण्यात आला होता. नवीन संकल्पना राबवून जनेतेचे प्रश्न सोडविण्याची जिद्द व चिकाटी असलेले डॉ. पंकज भोयर यांनी ही परंपरा अशीच सुरू ठेवली आहे.

जिल्ह्यात पालकमंत्र्यांचा प्रथमच जनता दरबार
आ. भोयर यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होणे ही जिल्ह्यासाठी भूषणावह बाब ठरली आहे. जिल्ह्याचे पालकत्व त्यांच्याकडे आल्याने त्यांनी पालकमंत्री म्हणून देखील जनता दरबाराची परंपरा कायम राखली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पालकमंत्री म्हणून कुण्या नेत्याने जनता दरबाराची संकल्पना प्रत्यक्षात उतरविली.

विकास भवन गर्दीने तुडूंब : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विकास भवन येथे आयोजित जनता दरबाराकरिता जिल्ह्यातील गावखेड्यांमधील शेतकरी, कष्टकरी, विविध पक्षीय कार्यकर्ते तसेच शहरांतील विविध क्षेत्रातील नागरिक, व्यावसायिक, शासकीय अधिकारी – कर्मचारी, शासनाच्या विविध उपक्रमांतील अस्थायी कर्मचारी, सामान्यजन, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक आपले विविध प्रश्न – समस्या घेऊन जनता दरबारात मोठ्या आशेने सहभागी झालेत. पालकमंत्री डॉ. भोयर यांनीही प्रत्येकाला वेळ देत त्यांचे प्रश्न समजून घेत त्यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करीत निराकरणाचा मार्ग सुकर केला.

नागरिकांच्या चेहरा-यावर उमटले स्मीत हास्य
जनता दरबाराच्या माध्यमातून आपली कैफीयत थेट मंत्र्यांनी ऐकून घेत आपल्या समस्या जाणून घेत प्रश्न निकाली काढण्याचा मार्ग सुकर झाला म्हणून नागरिकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य, समाधान पाहायला मिळाले. पालकमंत्री डॉ. भोयर यांनी नियमितपणे जनता दरबाराचे आयोजन करावे, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांनी व्यक्त केली.जनता दरबाराला पालकमंत्री यांच्या सह पोलिस अधीक्षक अनुराग जैन, उप विभागीय अधिकारी दीपक करंडे, जिल्हा परिषद च्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फनसे, तहसीलदार संदीप पुंडेकर यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: Wardhaआमदार डॉ. पंकज भोयरजनता दरबार
Previous Post

शिवराय स्पोर्टिंग क्लब मुरादपूर समुद्रपूर द्वारा टेनिस बॉल ग्रामीण क्रिकेट स्पर्धा आयोजित.

Next Post

सावनेर: मातोश्री वृद्धाश्रमात रंगोत्सव साजरा, शेकडो आश्रम वासीयांना कौटुंबिक अनुभूतीचा आभास.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सावनेर: मातोश्री वृद्धाश्रमात रंगोत्सव साजरा, शेकडो आश्रम वासीयांना कौटुंबिक अनुभूतीचा आभास.

सावनेर: मातोश्री वृद्धाश्रमात रंगोत्सव साजरा, शेकडो आश्रम वासीयांना कौटुंबिक अनुभूतीचा आभास.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In