महिला पतंजली योग समिती सावनेर तालुका व मातोश्री वृद्धाश्रम यांचे आयोजन
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १६ मार्च:- दरवर्षी प्रमाणे पतंजली योग समिती सावनेर व मातोश्री वृद्धाश्रम सोनपूर अदासा यांच्या संयुक्त प्रयत्नाने मातोश्री वृद्धाश्रम येथे रंगांचा सण होळीच्या शुभ मुहूर्तावर १२ मार्च ते १४ मार्च या कालावधीत तीन दिवसीय योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. १४ मार्च रोजी झालेल्या योगासनाचे संचालन ज्येष्ठ योग शिक्षक किशोर धुंडेले, महिला पतंजली तालुका प्रभारी लता ढवळे, सुनीता पाल, विनोद काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
१४ मार्च ला “धुलिवंदन” च्या शुभ मुहूर्तावर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत “रंगोत्सव” साजरा करण्यात आला. ज्येष्ठ योग शिक्षक राजेंद्र जुवारकर, सावनेर यांच्यासह निखिल भुते, दीपक झिंजुवाडिया, निखील पोटभरे आदी सह मातोश्री वृद्धाश्रमचे व्यवस्थापक, कर्मचारी वुंद व वृद्धाश्रमातील रहिवासी, महिला पतंजलीचे योग शिक्षक, शिक्षिका सहकारी आदींनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात रंगत आणली.
या रंग उत्सवाच्या विशेष कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला पतंजली योग समिती तालुका सावनेर, लताताई ढवळे, पराग जुवारकर, राजू काळबांडे, आशा धुंडेले, सुमीत चौधरी, मोहेंद्र चौधरी, आदींनी परिश्रम घेतले. तर या भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले तर मातोश्री वु्ध्दाश्रमातील सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांच्या अल्पोपहाराची योग्य व्यवस्था केली.
मातोश्री वृद्धाश्रम येथे आयोजित या “रंगोत्सव” मध्ये उपस्थित मान्यवरांनी आणि वृद्धाश्रमच्या रहिवाशांनी गीत गायन, शेरो शायरी आणि समूह नृत्य इत्यादीद्वारे वृद्धाश्रमातील रहिवाशांना प्रोत्साहित करीत त्यांना पारिवारिक आभास दीला. याप्रसंगी सावनेर तालुक्यातील मीडिया टीमने उपस्थित राहून सर्वांना प्रोत्साहन दिले. पियुष झिंजुवाडिया, मुकेश झरबडे, सुरज सेलकर, शुभम ढवळे, भुषण कुबडे, निखील पोटभरे, हरिष बुरे, भाऊ गोतमारे, सगर पोकळे, सागर बोंडे आदींनी प्रमुख उपस्थिती राहून रंगोत्सवाचा आनंद लुटला, तर डॉ.अमित बाहेती, डॉ. शिवम पुण्यानी, डॉ. गुंजन धुंडेले, डॉ.आशीष चांडक, पतंजली खापरखेडाचे योगशिक्षक, प्रतिक करंडे, रंजीताताई आदींचे विषेश सहयोग लाभले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरिश्चंद्र सावध,शरद चव्हाण, डीगांबर भगत, मंगला भगत,प्रकाश धोटे, प्रफुल कोल्हेकर आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन पतंजली योग पीठ हरिद्वारचे मुख्य योग शिक्षक किशोर धुंडेले, प्रास्ताविक मातोश्री वुध्दाश्रमचे प्रदिप चंदनबटवे नी तर आभार प्रदर्शन युवा उद्योजक राजू काळबांडे यांनी केले.

