आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका इंजिनिअर पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत 3 वर्षाच्या चिमुकल्या मुलाचा गळा चिरून हत्या करून आपल्या मुलाचा मृतदेह जंगलात फेकला दिला आहे. ही खळबळजनक घटना पुणे शहरातील चंदन नगर भागात घडली आहे. घटनेनंतर आरोपी एका लॉजमध्ये नशेच्या अवस्थेत सापडला. माधव टिकेती असे आरोपीचे नाव असून हिंमत माधव टिकेती असे हत्या करण्यात आलेल्या चिमुकल्यांचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक हिंमत माधव टिकेती वय 3 वर्ष हा इंजिनिअर माधव टिकेती आणि त्याची पत्नी स्वरूपा याचा एकुलता एक मुलगा होता. हे कुटुंब मूळचं आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टनम येथील आहे. पती पत्नीच्या भांडणानंतर मुलाला घरातून बाहेर काढलं होते. आरोपी माधव याला आपल्या पत्नी स्वरूपाच्या चारित्र्यावर संशय होता. गुरुवारी दुपारच्या सुमारास दाम्पत्यामध्ये जोरदार भांडण झाले. यात रागाच्या भरात माधवने त्याच्या मुलाला घराबाहेर काढले. दिवसभर मुलगा बाहेर बसून राहिला. त्यानंतर दुपारी 12.30 तो बाहेर गेला. त्यानंतर एका सुपर मार्केटमध्ये जात पुन्हा चंदनगरच्या जंगलात गेला. बरेच तास उलटले तरी पतीशी संपर्क न झाल्याने पत्नीने चंदन नगर पोलीस स्टेशन मध्ये पती आणि मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
लॉजमध्ये नशेच्या अवस्थेत मिळून आला आरोपी: पत्नीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यात माधव अखेरचं गुरुवारी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास त्याच्या मुलासह दिसून आला. त्यानंतर संध्याकाळी 5.00 वाजता फुटेजमध्ये माधव एकटाच कपडे खरेदी करताना दिसून आला. माधवचं फोन लोकेशन पोलिसांनी ट्रॅक करत त्याला लॉजमध्ये पकडले. त्यावेळी माधव नशेत होता. त्याला शुद्ध आल्यानंतर माधवने मुलाची हत्या केल्याचं कबुल केले. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी जात जंगलात मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला.
इंजिनिअर बापानेच केली मुलाची हत्या: रात्री मुलाची आई पोलीस स्टेशनला आली, तिने पती आणि मुलगा बेपत्ता असल्याचं सांगितले. तपासात मुलाचे वडील नशेत एका लॉजमध्ये सापडले. त्यांना ताब्यात घेतले तेव्हा मुलाच्या हत्येचा गुन्हा कबुल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. सध्या आरोपी पोलीस तावडीत असून पुढील तपास सुरू आहे.

