मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट २२ मार्च:- पट शौकीन स्वर्गीय कृष्णरावजी झोटिंग पाटील व वृषभ सेठ सुराणा, मनुभाईजी कोचर, बैलड्रायव्हर मारोतराव राऊत, स्व. धनराज कलोडे, स्व.वसंत पाटील पोंगडे यांचे स्मृती प्रित्यर्थ हिंगणघाट येथे शेतकरी शंकर पट व नाट्य महोत्सवाचे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एड.सुधीर कोठारी यांच्या वतीने दिनांक २१ ते २४ मार्च दरम्यान आयोजन केले आहे.
सदर शंकर पट व नाट्य महोत्सवाचे आयोजन शहरानजीकच्या नांदगाव ता.हिंगणघाट येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळा शुक्रवार दि.२१ मार्च रोजी सायंकाळी ०५ वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच परिसरातील नागरिकांच्या उपस्थित बैलजोडीची व छक्याचे पूजन करून संपन्न झाला. नागरिकांनी तसेच शेतकरी बांधवांनी या सोहळ्यास उपस्थित राहून नाट्य महोत्सव व शंकरपटाचा लाभ घ्यावा, अशी विनंती कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार प्रा.राजू तिमांडे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एड.सुधीर कोठारी यांनी केले आहे.
याच दरम्यान आयोजीत नाट्यमहोत्सवा अंतर्गत युवा रंगमंच वडसा प्रस्तुत”भूक” या सुप्रसिद्ध नाटकाचे आयोजन दि.२२ मार्च रोजी सायं. ६ वाजता तर दि.२३ मार्च रोजी रंगतरंग थिएटर्स वडसा प्रस्तुत “नशीब” या नाटकाचे आयोजन करण्यात येईल.
या शंकपटात विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक नामवंत बैलजोड्या भाग घेणार असून रोख रकमेच्या बक्षिसांची मोठ्या प्रमाणात लयलूट करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला माजी आमदार प्रा.राजू तिमांडे, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती एड.सुधीर कोठारी, समुद्रपूर बाजार समितीचे सभापती हिंमत चतुर, उद्योजक प्रसन्ना बैध, बाजार समितीचे उपसभापती हरीश वाडतकर, सौरभ तिमांडे, मधुकर डंभारे, उत्तम भोयर, पिंटू बादले, दिगंबर चांभारे, पंकज कोचर, आफताब खान, गौरव तिमांडे, हरिभाऊ धवणे, अनिल दौलतकर, राजू भोरे, सागर तिमांडे, निशान बोरकुटे, तेजस तडस, अमित कोठारी, दीपक माडे, फैजान सय्यद, हर्षल तपासे, ओम सावरकर, यश खेनवार, संजय तुराळे, बबलू कोल्हे, अविनाश खटी, जयदेव दारुंडे, अक्षय भगत इत्यादी पटप्रेमी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.