विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली दिनांक १७:- एटापल्ली येथील शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्थाचे भयानक सत्य आलं समोर, शिक्षणाच्या नावावर फक्त नाटक सुरू असल्याची चर्चा परिसरात सुरू होती त्यामुळे पाच पत्रकार एटापल्ली-कृष्णार रस्त्यावर विराजमान असलेल्या राजाराम जंबोजवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) एटापल्ली येथे संस्थेचे परिसरात पाहणी करण्यासाठी गेले असता भयानक सत्य आलं समोर आले आहे.
सकाळी 11.30 वाजलेले होते. परिसर गजबजलेले असेल असे वाटत होते. परंतु परिसरात सुकसुकाट होता व कोणीही विध्यार्थी आढळून आला नाही. मग सर्व पत्रकारानी संस्थेच्या ईमारतीत प्रवेश केला असता भयानक सत्य समोर आले.
ज्यांच्यावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाची संपूर्ण जबाबदारी आहे ते प्राचार्य, उपप्राचार्य यांच्या दालनाला कुलुपे लावल्याचे आढळून आले. कुतुहलाने बाजूला डोकावून पाहले असता “कार्यालय” असा भिंतीवर लिहिलेले दिसले. तेंव्हा आत प्रवेश केला. तिथे टेंभे नामक एकुलते एक इंसट्रक्टर हजर होते. एक सफाई कामगार व एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी एवढेच कर्मचारी उपस्थित होते. बाकी एक कर्मचारी स्वाक्षरी केलेले होते व एक कंत्राटी कर्मचारी स्वाक्षरी केलेले निदर्शनास आली. उपस्थित शिक्षकांना इतर नियमित व कंत्राटी तसेच तासिका निहाय कर्मचारी बाबतीत अनुपस्थितीस अनुकुलतेबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. परंतु वेळ, नियोजन, कर्तव्य, जबाबदारी याचे कोणालाही सोयर-सुतक नव्हते. अशी विदारक अवस्था येथे पाहण्यासाठी मिळाली.
ह्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत आजच्या घडीला एकुण नियमित प्रशिक्षकचे 5 पदे हजेरी पटावर नमूद आहेत व कंत्राटी 6 पदे आहेत. या पैकीं आम्ही उपस्थित असतांना मुल्लेटी व मंडल हे उपस्थित झाले. यांना उशिरापर्यंत येण्याबद्दल विचारणा केली असता वैयक्तिक कारणे दिलेत.
ह्या प्रशिक्षण संस्थेत प्रत्येक व्यवसाय शिक्षण विध्यार्थी मर्यादा 32 निर्धिष्ठीत आहे. सन २०२४- २०२५ सत्रात फीटरचे प्रवेशित विध्यार्थी प्रशिक्षणार्थी 16 आहेत. सिव्हिल टेक्निशियनचे 19 विध्यार्थी प्रशिक्षणार्थी आहेत. वेल्डरचे 19 प्रशिक्षणार्थी विध्यार्थी 19 आहेत. शिवणकामाचे 32 विध्यार्थीणी प्रशिक्षणार्थी आहेत. व ड्रेसमेकर 19 विध्यार्थी प्रशिक्षणार्थी आहेत. याप्रमाणे एकूण पटावर सर्व व्यवसायिक प्रशिक्षणार्थी विध्यार्थी 105 आहेत. परंतु ह्या 105 विध्यार्थ्या पैकी फक्त 02 विध्यार्थी फीटर प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
2 महीण्यापासुन काहीच शिकविले नाही: वर्गात उपस्थित असलेल्या विद्यार्थांना व्यावसायिक प्रशिक्षण बाबत विचारणा केली असता 2 महीण्यापासुन शिक्षकांनी काहीच शिकविले नाही असे स्पष्ट सांगितले. सोबतीला एक सिव्हिल टेक्निशियनचा विध्यार्थी उपस्थित होता. त्याला अभ्यासक्रम बाबत माहितीच नव्हती. एवढी भिषण अवस्था प्रत्यक्ष अनुभवाला मिळाली.
प्राचार्य मूग गिळून गप्प? याबाबत प्राचार्य कौशल्य विकास रोजगार व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबत माहिती भ्रमणध्वनी वरून विचारणा केली असता प्राचार्य यांनी काहीही सांगण्यात नकार दिला व असमर्थता दर्शविली. ज्यांच्यावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाची संपूर्ण जबाबदारी आहे ते प्राचार्य मूग गिळून गप्प? असेल तर शिक्षणाचा काय दर्जा असेल हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जर एवढ्या अफाट विध्यार्थी संख्येत फक्त तीनच विध्यार्थी उपस्थित राहणार असतील तर ढगभर कर्मचारी यांची आवश्यकता कशाला? इथे या उपरांत एक “स्मार्ट रुम” आहे. यात जबरदस्त बैठक व्यवस्था आहे. त्यात स्क्रीन भिंतीवर लटकवलेला आहे. तोही महागडा आहे. परंतु त्याला वापर करण्याकरिता व विध्यार्थी ज्ञान ग्रहण करतात अशी रचनाच केलेली नाही. यावरुन विध्यार्थ्या प्रती प्रशासन कीतपत जागरूक असेल. हे न सांगण्यासारखे आहे. स्मार्ट क्लास मध्ये तर धुळीने साम्राज्य केलेले स्पष्ट दिसून येत होते.
अनेक पदे रिक्त विध्यार्थी भगवान भरोसे? ह्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत एकूण पदांवर लक्ष वेधले असता मंजुर पदे 10 असून तीनच शिक्षक पदे भरली असल्याचे सांगितले. व 7 पदे रिक्त आहेत. त्यामुळे तासिका निहाय 5 पदे शिक्षक सांभाळत आहेत. असे उपस्थितांनी सांगितले. कनिष्ठ लीपिकाची दोन पदे मंजूर आहे. व दोनही पदे रिक्त आहेत. जेष्ठ लीपिकाचे एक पद असून परीपूर्ण आहे. भांडार सहाय्यक एक पद आहे व परीपूर्ण आहे. चतुर्थ श्रेणी एक पद आहे व परीपूर्ण आहे.
जर तीन विध्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकारी/कर्मचारी यांची आवश्यकताच नाही तर विनाकारण नाहक खर्च करण्यात काय अर्थ?
ह्या व्यतिरिक्त कौशल्य विकास व रोजगार उद्योजक ह्यात बत्तीस प्रशिक्षण घेणारे असुन यांचेवर साहित्य खरेदी, शिष्यवृत्ती यांचेवर लाखो रुपये खर्च दाखवले जाते. तर हे प्रशिक्षणार्थी गेले कुठे? हाही मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.
या सर्व बाबी वरुन विध्यार्थ्यांप्रती कीतपत तळमळ व आत्मीयता तसेच कर्तव्याची जाणीव आहे ह्याचीच खंत वाटते.

