मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल नुसताच जाहीर झाला आहे. दरम्यान, हिंगणघाट तालुक्यातील जामणी येथील इंदूबाई बोरकर (सातपुते) या महिलेने वयाच्या 67 वर्षी जिद्दीने 10 वीची परीक्षा उत्तीर्ण करून 10 वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केले आहे.
इंदूबाई बोरकर (सातपुते) यांना त्यांच्या परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. वयाच्या 67 व्या वर्षी 10 वीची परीक्षा देत 51% टक्के गुण मिळवत इंदूबाई बोरकर (सातपुते) या परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंत इंदूबाई बोरकर (सातपुते) यांच्या मनात होती, त्यामुळं त्यांनी 67 व्या वर्षी इयत्ता 10 वी परीक्षा दिली. त्यामुळे इंदूबाई बोरकर (सातपुते) यांच सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे
आज दि.14 मे ला श्रीमती इंदूबाई बोरकर (सातपुते) वयाच्या 67 व्या वर्षी ईयत्ता दहावीमधे 51.00% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबदल शिवसेना पक्षातर्फे त्यांच्या राहत्या घरी जामणी येथे जाऊन त्यांचा सम्मान करण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

