विद्युत पोल पडूनही वीज पुरवठा चालूच जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण?
रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मंठा:- शेतकऱ्याच्या शेतात विद्युत पोल वादळी वाऱ्याने पडल्यामुळे शेतकरी विनोद शिवाजीराव राठोड यांनी उपकार्यकारी अभियंता विज वितरण कार्यालय मंठा यांना विद्युत पोल पडल्याची तक्रार अर्ज दिनांक १० मे रोजी देऊनही प्रशासनाने साधी दखल घेतली नाही. त्यामुळे विज वितरण विभागाचा अजून एक प्रताप समोर आला आहे.
एखाद्या शेतात जाणाऱ्या शेतकरी किंवा गुरे चारणाऱ्या व्यक्तीची जीवीत हानी होऊ शकते त्यामुळे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी व उपकार्यकारी अभियंता यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मौजे मोसा तांडा येथील 3 फेज D P वरील शेती पंपाला वीज पुरवठा करणारे पोल श्री अविनाश राठोड श्री देविदास राठोड श्री अर्जुन राठोड यांच्या शेतातून जाणाऱ्या विदुत प्रहावाचे पोल वादळी वाऱ्या मुळे पूर्णता पडलेले असून आपल्या आधीन कर्मचारी यांना वारंवार मोबाईल द्वारे विदयुत पोल पडल्याच्या सूचना देऊन ही कुठल्या ही प्रकारे प्रतिसाद मिळालेला नाही तरी वादळी वाऱ्या मुळे पडलेल्या विदयुत पोलच्या प्रहावा मुळे जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे तरी काही जीवित हानी झाली तर त्याची पूर्णस्व जबाबदारी उपकार्यकारी अभियंता वीज वितरण मंठा व परतूर हे जबाबदार राहतील अशे स्पष्ट मत विनोद शिवाजी राठोड मौजे मोसा तांडा ता मंठा जि जालना यांनी केले आहे

