सानवी मोरे हिला आवड चित्रकलेची पण मोठे होऊन बनायचे आहे कृषी अधिकारी.
संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा २८ जुलै:- आपल्या भारत देशाला सन समारंभ आणि उत्सवांचा देश म्हणून ओळखतात. आपल्याकडे प्रत्येक ऋतूप्रमाणे सण आणि उत्सवांचे आयोजन केले असल्याचे दिसून येते. यातला सर्वात मोठा सण उत्सवांचा काळ आहे तो श्रावण महिन्याचा. श्रावण महिना हा सात्विक भक्तिभावाने पुनीत असा महिना मानला जातो या महिन्यात अनेक व्रतवैकल्य केले जातात. या एका महिन्यात अनेक लहान मोठ्या सणांचे व्रतांचे आयोजन करून आनंद घेतला जातो. महर्षी उत्तम स्वामी महाराज कनिष्ठ महाविद्यालय चिंचोली (खुर्द ) येथे इयत्ता अकरावी मध्ये शिकणारी सानवी जयश्री सचिन मोरे ही राजुरा येथील रहवासी आहे.
लहानपणापासूनच चित्रकलेची आवड परंतु कुठलेही चित्रकलेचे वर्ग न करता ती आवडीने चित्र काढते. राजुरा येथील अतिशय प्राचीन असलेलं श्री सोमेश्वर देवस्थान मंदिराचे चित्र साकारून ती छायाचित्र प्रतिमा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांना भेट म्हणून दिले. श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी तीने हे चित्र सोमेश्वर देवस्थान मंदिराचे परिसरात भेट दिले.
सानवी मोरे हिला आज पर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. घरगुती गणेश सजावट स्पर्धा प्रथम क्रमांक , युवा सेनेच्या पर्यावरणपूरक घरगुती गणेश सजावट स्पर्धा प्रथम पुरस्कार , देशभक्तीपर वेशभूषा व डायलॉग स्पर्धा तृतीय पुरस्कार, मातीचे किल्ले निर्मिती स्पर्धा प्रथम पुरस्कार, पर्यावरण पूरक तान्हा पोळा स्पर्धेत तृतीय क्रमांक, वेकोली द्वारा आयोजित चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक, तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये बुद्धिबळ मध्ये द्वितीय क्रमांक असे विवीध स्पर्धांमध्ये तिने बक्षिसे मिळविली आहेत. तिला चित्रकलेमध्ये आवड असली तरीही मोठे होऊन कृषी अधिकारी व्हायचे तिचे स्वप्न आहे. केवळ चित्रकलाच नाही तर अतिशय सुंदर अशी रांगोळी, कुंड्यावरील पेंटिंग, कोलाज चित्र निर्मिती ती अतीशय सुरेखपणे काढते. तिचे आई वडील दोघेही शिक्षक आहेत.

